छोट्या पडद्यावरील लोकप्रिय चेहरा पार्थ समथानने नुकताच ALT बालाजीच्या 'मैं हीरो बोल रहा हूं'मधून डिजिटल प्लॅटफॉर्मवर एन्ट्री केली आहे. सध्या पार्थ तरुणींमध्ये खूपच प्रसिद्ध आहे. मात्र एकवेळ अशी होती की कोणतीच मुलगी पार्थकडे बघण्यासही तयार नव्हती.
2/ 10
'कसौटी जिंदगी की'मुळे पार्थला घराघरात ओळखलं जातं. सोशल मीडियावरसुद्धा त्याचे खूप फॉलोअर्स आहेत. मात्र शालेय वयात पार्थ खूपच लठ्ठ होता.
3/ 10
शालेय वयात पार्थचं वजन तब्बल 110 किलो इतकं होतं. सर्वजण वजनावरून पार्थची थट्टा करत असत.
4/ 10
मात्र एके दिवशी स्वतः पार्थला आपल्या वाढलेल्या वजनाची जाणीव झाली आणि पार्थने वजन कमी करण्याचं मनाशी पक्क केलं.
5/ 10
माध्यमांना दिलेल्या मुलाखतीमध्ये खुलासा करत पार्थनं म्हटलं होतं, मी जवळजवळ 110 किलोंचा होतो. मुलीतर माझ्या जवळसुद्धा फिरकत नव्हत्या आणि मी खूपच लाजरा होतो. त्यामुळे मी कधी मुलींशी बोलतही नसे.
6/ 10
पार्थला स्पोर्ट्सचीसुद्धा प्रचंड आवड होती. मात्र जास्त वजनामुळे त्याला नेहमीच बाजूला केलं जायचं.
7/ 10
पार्थने जेव्हा वजन कमी करण्यास सुरुवात केली तेव्हा त्याने फक्त चार महिन्यात 32 किलो वजन कमी केलं होतं.
8/ 10
वजन कमी केल्यानंतर पार्थ टेबल टेनिस खेळू लागला. इतकंच नव्हे तर तो चक्क स्टेट लेवल प्लेयर बनला. त्यानंतर पार्थने राज्य स्तरीय स्पर्धेत टेबल टेनिससुद्धा खेळलं आहे.
9/ 10
छोट्या पडद्यानंतर पार्थ आता ओटीटी आणि चित्रपटांवर लक्ष केंद्रीत करत आहे. पार्थ लवकरच एका चित्रपटात झळकणार आहे, त्यात आलिया भट्ट मुख्य भूमिकेत असणार आहे.
10/ 10
पार्थने MTV वरील 'कैसी है यारीयां' या युथ बेस्ड मालिकेत काम केलं होतं. ही मालिका तरुणाई मध्ये खूपच प्रसिद्ध होती. आजही पार्थला या मालिकेतील 'माणिक' या नावाने ओळखलं जातं.