छोट्या पडद्यावरील मराठी मालिका 'श्रीमंत घरची सून' मोठ्या प्रमाणात पसंत केली जाते. कमी वेळेत मालिकेने मोठी लोकप्रियता मिळवली आहे. मालिकेमध्ये लवकरच वटपौर्णिमा विशेष भाग पाहाला मिळणार आहे. मालिकेत अनन्याची लग्नानंतरची ही पहिलीचं वटपौर्णिमा आहे. मात्र अनन्यासोबत पती अथर्वदेखील वडाची पूजा करत आहे. सोबतचं सात जन्म आपल्यला हीच बायको मिळावी अशी प्रार्थनादेखील करत आहे. मालिकेत सध्या आनंदाचं वातावरण आहे. अनन्या आपल्या सासूबाई आणि जावेसोबत वटपौर्णिमा साजरी करत आहे. त्यामुळे मालिकेत सध्या उत्साही वातावरण आहे.