'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेतून सुमीच्या रुपता अमृता घराघरात पोहोचली होती. या मालिकेमुळे तिला मोठी लोकप्रियता मिळाली होती. अमृताने नुकताच आपल्या सोशल मीडियावर काही फोटो शेयर केले आहेत. हे फोटो चाहत्यांना खुपचं पसंत पडत आहे. फोटोमध्ये अमृता लाल रंगाच्या साडीत खुपचं सुंदर दिसत आहे. प्लेन शिफोन साडीमध्ये अमृताचं रूप अगदी खुलून दिसत आहे. चाहते या फोटोंवर मोठ्या लाईक्स आंनी कमेंट्स करत आहेत. आजही तिला चाहते सुमी या नावानेच खास ओळखतात. यानंतर अमृता अभिनेता सचित पाटीलसोबत 'चांदणे शिंपित जाशी' या मालिकेत झळकली होती. मात्र अमृताला खरी ओळख ही 'मिसेस मुख्यमंत्री' मालिकेतूनचं मिळाली होती.