बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असलेला राहुल वैद्य आणि दिशा परमारचा लग्नसोहळा काल पार पडला. यामध्ये अनेक कलाकरांनी उपस्थिती लावली होती. काल दिशा आणि राहुल विवाह बंधनात अडकले. त्यांनतर रात्री त्यांनी रिसेप्शनसुद्धा उरकून घेतलं आहे. राहुलचे खतरों के खिलाडी मधील प्रतिस्पर्धी आणि कलाकार अर्जुन बिजलानी आणि अनुष्का सेनसुद्धा पार्टीत दिसून आले. बिग बॉसमध्ये राहुलची अली गोनीसोबत घट्ट मैत्री झाली होती. अली लग्नात आणि रिसेप्शन दोन्हीमध्ये राहुलसोबत दिसून आला. अभिनेत्री सना मकबूलसुद्धा दिशा आणि राहुलसोबत दिसून आली. अनुष्का आणि सनासोबतचं अभिनेत्री श्वेता तिवारीने सुद्धा या पार्टीमध्ये हजेरी लावली होती. तसेच पार्टीमध्ये अभिनेता विशाल सिंह आणि अनुष्का सेनची मजामस्तीसुद्धा दिसून आली.