बिग बाॅस 12चा शेवटचा आठवडा सुरू आहे. आश्चर्य म्हणजे सुरभी राणाला घरातून बाहेर काढलंय. आता दीपक, श्रीशांत, रोमिल, दीपिका आणि करणवीर यांच्यात लढाई सुरू आहे. पण सोशल मीडियावर एक गोष्ट व्हायरल होतेय. ती म्हणजे श्रीशांतच विजेता ठरणार आहे. खरं आहे का हे?
2/ 5
Bigg Boss Ticket to Final Week जिंकणाऱ्या सुरभी राणाला घरातून बाहेर पडावं लागलं. आता उरलेल्यांना व्होटिंगनं जिंकावं लागणार अाहे. मग त्यात लोकप्रियता तर श्रीशांतची जास्त आहे.
3/ 5
सुरभी बिग बाॅसच्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्रीनं आली होती. ती रोमिलसोबत आली होती. आल्या आल्या तिनं मोठा हंगामा केला होता. ती वादग्रस्त ठरलीय.
4/ 5
गेल्या भागात सुरभी तिकीट टू फिनाले जिंकून सुरक्षित होती. तरीही तिला बाहेर पडावं लागलं होतं.
5/ 5
सुरभी राणा नेहमीच तिचा राग, भांडणं यामुळे गाजत होती. रोमिलला ती भाऊ मानायची. पण नंतर दोघांमध्येही दुरावा आला. ती सोमी अली आणि दीपकचीही चांगली मैत्रीण होती.