कोमोलिका पुन्हा विवाहबंधनात अडकणार? 41 वर्षीय अभिनेत्रीने केला असा खुलासा
टेलिव्हिजनची प्रसिद्ध खलनायिका 'कोमोलिका' अर्थात अभिनेत्री उर्वशी ढोलकिया (Urvashi Dholakia) सध्या तिच्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे. 41 वर्षीय उर्वशी ने अनेक वर्षांनंतर तिच्या लग्नाबाबत एक खुलासा केला आहे.
|
1/ 8
कोमोलिका अर्थात अभिनेत्री उर्वशी ढोलकिया (Urvashi Dholakia) सध्या तिच्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे. 41 वर्षीय उर्वशी ने अनेक वर्षांनंतर तिच्या लग्नाबाबत एक खुलासा केला आहे.
2/ 8
बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून उर्वशीची ओळख आहे. अनेक मालिकांध्ये तीने आजवर काम केलं आहे.
3/ 8
एकता कपूरची लोकप्रिय मालिका कसौटी जिंदगी की मध्ये ती कोमोलिकाच्या भूमिकेत होती. ती भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. तर यानंतर तिला तूफान लोकप्रियता मिळाली होती.
4/ 8
कोमोलिका या खलनायिकेच्या भूमिकेमुळे ती घराघरात पोहोचली होती. तर तिची ही व्यक्तीरेखा त्यावेळी सर्वात जास्त लोकप्रिय व्यक्तिरेखा म्हणून नोंद झाली होती.
5/ 8
उर्वशीने वयाच्या 17 व्या वर्षी लग्न केले होते. तर तिला सागर आणि क्षितीज अशी दोन जुळी मुलं आहेत. ती एक Single Mother आहे
6/ 8
इ टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत तिला लग्नाविषयी विचारलं असता तिने, 'असं नाही की माझी वेळ निघून गेली. पण एक पॉइंटनंतर कोणत्याही गोष्टीवर मी विचार करु शकत नाही. जर माझे लग्न व्हायचे असेल तर ते कधी तरी होईलच. असं उर्वशी म्हणाली.
7/ 8
त्यामुळे उर्वशीच्या या वक्तव्याने ती खरच लग्न करणार का? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.
8/ 8
उर्वशीने 'देख भाई देख', 'शक्तिमान', 'मेहंदी तेरे नाम की', 'चंद्रकांता', 'इश्क' मे मरजावा या मालिकांमध्ये काम केले आहे.