सोशल मीडियावर प्रियाने आपले बिकिनी फोटो पोस्ट करत एक मोठा संदेश देखील लिहिला आहे. प्रिया आई झाल्याने तिचं वजन वाढलं आहे. तिच्या शरीरावर स्ट्रेच मार्क्स आले आहेत आणि तरीसुद्धा तिनं बिकिनी घातली आहे. आपण कसे दिसू, याची मला मुळीच लाज वाटत नाहीये, असं ती लिहिते.