'कुंडली भाग्य' मधील साधी सरळ प्रीता सर्वांनाचं माहिती आहे. मात्र प्रीताला बिकिनीमध्ये पाहून चाहतेही अवाक् झाले आहेत. प्रीता म्हणजेच अभिनेत्री श्रद्धा आर्या रियल लाईफमध्ये एकदम हॉट आणि बोल्ड आहे. श्रद्धा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणत सक्रीय असते. ती इन्स्टाग्रामवर सतत आपले हॉट फोटो शेयर करत असते. 'कुंडली भाग्य' मध्ये प्रीताला अगदी सोज्वळ सुनेच्या रुपात दाखवण्यात आलं आहे. मात्र रियलमध्ये श्रद्धा आपल्या लुकबाबत खुपचं बिनधास्त आहे. श्रद्धा जितकी सुंदर आहे तितकीच ती एक उत्तम अभिनेत्री आहे. श्रद्धाने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. श्रद्धाने काही चित्रपटात सुद्धा काम केलं आहे. मात्र तिला प्रसिद्धी 'कुंडली भाग्य' या छोट्या पडद्यावरील मालिकेमुळे मिळाली आहे.