अभिनेत्री रुबिना दिलैक सतत आपल्या नवनवीन लुकमुळे चर्चेत असते. नुकताच रुबिनाने आपले काही फोटो इन्स्टाग्रामवर शेयर केले आहेत. त्यामध्ये ती लेहंग्यावर चक्क शूज घातलेली दिसत आहे. रुबिनाच्या या खास अंदाजची सध्या चांगलीच चर्चा होतं आहे. रुबिना कधी आपल्या लुकमुळे चांगलीच प्रसिद्ध होते. तर कधी त्याला ट्रोल करण्यात येत. रुबिना सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहे. इन्स्टाग्रामवर तिचे खुपचं मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स आहेत. 'बिग बॉस 14' मुळे ती खूपच लोकप्रिय झाली होती. या पर्वाची ती विजेतीदेखील ठरली आहे. रुबिनाने अनेक मालिकांमध्ये काम केल आहे. तसेच रुबिनाने काही अल्बम सॉंगसुद्धा केले आहेत.