छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे काल आपला बॉयफ्रेंड विकी जैनसोबत लग्नाच्या बेडीत अडकली. गेली अनेक दिवस तिच्या लग्नाची चर्चा सुरु होती. काल अखेर हा शाही विवाहसोहळा थाटामाटात पार पडला. अभिनेत्रीने सोनेरी रंगाचा घेरदार लेहंगा घातला होता. हा लेहंगा मनीष मल्होत्राने डिझाईन केला होता. या पोशाखात अभिनेत्री फारच सुंदर दिसत होती. फक्त सुंदरच नव्हे तर ती एखाद्या राजकुमारी सारखी भासत होती. अभिनेत्रीने लग्नाच्या काही वेळेनंतर आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नाचे फोटो शेअर करत आपला आनंद व्यक्त केला आहे. अंकिता लोखंडेचं लग्न फार थाटामाटात झालं.मुंबईच्या प्रसिद्ध ग्रँड हयात हॉटेलमध्ये हा विवाहसोहळा पार पडला. अंकिताच्या लग्नासाठी हॉटेलला अगदी राजवाड्यासारखं सजवण्यात आलं होतं. तसेच विविध महाराष्ट्रीयन थीमसुद्धा ठेवण्यात आल्या होत्या. अंकिता आणि विकी २०१८ पासून एकमेकांना डेट करत होते. त्यांनी सोशल मीडियावर आपल्या प्रेमाचा खुलासा केला होता. दोघेही सोशल मीडियावर सतत आपले रोमँटिक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असत. विकी जैन हा एक उद्योजक आहे. तर त्याचे वडीलसुद्धा एक कोळसा उद्योजक आहेत.