Gurmeet Choudhary: गुरमीत आणि देबिनाने जाहीर केलं दुसऱ्या लेकीचं नाव; अर्थ आहे फारच अध्यात्मिक
टीव्ही क्षेत्रातील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक म्हणून अभिनेता गुरमीत चौधरी आणि देबिना बॅनर्जीला ओळखलं जातं. देबिना आणि गुरमीत नेहमीच कपल गोल्स देत असतात.
टीव्ही क्षेत्रातील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक म्हणून अभिनेता गुरमीत चौधरी आणि देबिना बॅनर्जीला ओळखलं जातं. देबिना आणि गुरमीत नेहमीच कपल गोल्स देत असतात.
2/ 8
देबिना बॅनर्जीने काही दिवसांपूर्वीच आपल्या दुसऱ्या लेकीला जन्म दिला आहे. त्यामुळे हे जोडपं सध्या प्रचंड आनंदी आहे.
3/ 8
काही महिन्यांपूर्वीच देबिना आणि गुरमीतने आपल्या पहिल्या लेकीचं स्वागत केलं होतं. त्यानंतर अवघ्या काहीच महिन्यात अभिनेत्रीने आपल्या दुसऱ्या प्रेग्नेंसीची घोषणा केली होती.
4/ 8
सध्या गुरमीत आणि देबिना आपल्या दोन लाडक्या लेकींसोबत संपूर्ण वेळ घालवत आहेत. त्यांच्या मोठ्या लेकीचं नाव लियाना असं ठेवलं होतं.
5/ 8
आता या सेलिब्रेटी कपलने आपल्या धाकट्या लेकीचं नाव उघड केलं आहे. या दोघांनी आपल्या लेकीचं नाव 'दिविशा' असं ठेवलं आहे.
6/ 8
हे नाव फारच खास आहे. या दोघांनी नाव जाहीर करत या नावाचा अर्थदेखील सांगितला आहे.
7/ 8
'दिविशा' चा अर्थ सर्व देवी/ देवी दुर्गा यांची प्रमुख असा होत असल्याचं गुरमीत आणि देबिनाने उघड केलं आहे.
8/ 8
या दोघांनी समुद्रकिनारी आपल्या लेकीला सोबत घेऊन अगदी फिल्मी स्टाईलने नाव जाहीर केलं आहे. या पोस्टनंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.