'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतुन राणा आणि अंजली घराघरात पोहोचले आहेत. ही भूमिका अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांनी साकारली होती. रील लाईफमधील हे लोकप्रिय कपल आता रियल लाईफ कपल बनलं आहे. नुकतंच अक्षया आणि हार्दिकने साखरपुडा करत सर्वांनाच सुखद धक्का दिला आहे. या दोघांच्या साखरपुड्याचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नुकतंच तुझ्यात जीव रंगला फेम वहिनीसाहेब अर्थातच अभिनेत्री धनश्री काडगावकरने काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती हार्दिक आणि अक्षयासोबत पोज देताना दिसून येत आहे. इतकंच नव्हे तर या मालिकेची संपूर्ण टीम यावेळी उपस्थित आहे. सोबतच ती धम्माल करताना दिसून येत आहेत.