राणाने अंजलीला दिलं खास सरप्राईज, हार्दिकने अक्षयाचा वाढदिवस बनवला स्पेशल
'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अक्षया देवधर आज आपला वाढदिवस साजरा करत आहे.
|
1/ 8
'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अक्षया देवधर आज आपला वाढदिवस साजरा करत आहे.
2/ 8
या मालिकेतून अंजलीच्या रुपात लोकप्रिय झालेल्या अक्षयाचा जन्म पुणे याठिकाणी झाला होता. अभिनेत्रीला होणाऱ्या पतीने अर्थातच अभिनेता हार्दिक जोशीने खास बर्थडे सरप्राईज दिलं आहे.
3/ 8
हार्दिक जोशीने नुकतंच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अक्षयासोबतचे काही फोटो शेअर करत तिला वाढदिसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
4/ 8
हार्दिकने शुभेच्छा देत लिहिलंय, 'माझ्या प्रेमाला आणि खूप खास व्यक्तीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा'.
5/ 8
हार्दिकने अक्षयाला खास सरप्राईज दिलं. अभिनेता केक घेऊन आपल्या होणाऱ्या पत्नीच्या घरी पोहोचला होता.
6/ 8
एका बॉक्समध्ये बंद असलेल्या या केकवर अक्षया आणि हार्दिकचे सुंदर फोटो लावण्यात आले आहेत.
7/ 8
अक्षया आणि हार्दिकने नुकतंच साखरपुडा करत सर्वांना सुखद धक्का दिला होता.
8/ 8
'तुझ्यात जीव रंगला'मालिकेतील राणा अंजलीची ही प्रसिद्ध जोडी आता रिअल लाईफ पती पत्नी बनणार आहेत.