'तुझ्यात जीव रंगला' मालिकेमुळे अंजली म्हणजेच अक्षया देवधर घराघरात पोहोचली आहे. अक्षयाने नुकताच व्हाईट साडीमधील फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेयर केले आहेत. यामध्ये अक्षया खूपच सुंदर आणि बोल्ड दिसत आहे. अक्षयाने फोटो शेयर करताच चाहत्यांकडून लाईक्स आणि शेयरचा वर्षाव होतं आहे. काही महिन्यांपूर्वीच तुझात जीव रंगला मालिकेने निरोप घेतला असला तरी अंजली आणि राणाची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे. अक्षयाला या मालिकेतून प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे.