मराठी मनोरंजनसृष्टीतील कलाकार सध्या आपल्या नव्या घराच्या गृह्प्रवेशामध्ये व्यग्र असल्याचं दिसून येत आहेत. लीना भागवत-मंगेश कदम, सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरनंतर आता मराठी अभिनेता राज हंचनाळे-मॉली डिसवालने नवं घर खरेदी केलं आहे. राज आणि पत्नी मॉलीने आपल्या सोशल मीडियावरून याबाबतची माहिती शेअर केली आहे. राजने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पत्नी मॉलीसोबतचे दोन फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये हे दोघेही पारंपरिक अंदाजात आपल्या नव्या घराच्या बाल्कनीत उभी असलेले दिसत आहेत. या दोघांनी नुकतंच आपल्या नव्या घरात गृहप्रवेश केला आहे. राज हंचनाळे हा 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतून घराघरात पोहोचला आहे. सध्या तो 'जीवाची होतिया काहिली' या मालिकेतून पुन्हा पडद्यावर कमबॅक करत आहे.