PHOTO: हळद लागली! आता 'या' दिवशी अभिनेत्री अमृता पवारच्या डोक्यावर पडणार लग्नाच्या अक्षता
तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं ( tujhya majhya sansara ani kay hava) या मालिकेतील सर्वांची लाडकी अदिती म्हणजेच अभिनेत्री अमृता पवार (amruta pawar) लवकरचं लग्नबंधनात अडकणार आहे. नुकताच तिचा मेहंदी आणि हळदी समारंभ पार पडला. पाहा अदिती आणि नील यांच्या हळदीचे फोटो.
|
1/ 12
तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं अभिनेत्री अमृता पवारचा काही दिवसांपूर्वीच साखरपुडा पार पडला.
2/ 12
अमृतानं नुकतीच तिची बॅचलर्स पार्टी देखील सेलिब्रेट केली.
3/ 12
'ब्राइड टू बी' म्हणत अमृतानं तिच्या लग्नाची बातमी सर्वांना दिली होती.
4/ 12
अमृताचा मेहंदी आणि हळदी सोहळा नुकताच पार पडला.
5/ 12
अमृताच्या गोऱ्या गोऱ्या गालावर नीलच्या हळदीचा रंग चांगलाच खुलून आला होता.
6/ 12
हळदीसाठी अमृतानं खास गडद पिवळ्या रंगाची साडी नेसली होती.
7/ 12
आर्टिफिशअल फुलांचे दागिन्यात अमृताचा लुक खुपच सुंदर दिसत होता.
8/ 12
अमृताच्या दुल्हनिया असं लिहिलेल्या आकर्षक कानातल्यांनी सर्वांचं लक्ष वेधलं.
9/ 12
अमृताचे जवळचे सगळे मित्र मैत्रिणी हळदीला आले होते. अभिनेता शुभंकर तावडे आणि टेलिव्हिजनवरील अनेक कलाकारांनी अमृताच्या हळदीला धम्माल केली.
10/ 12
सर्वांनी अमृता आणि नील यांच्याबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शैअर केले आहेत.
11/ 12
काल सोमवारी म्हणजे 4 जुलैला अमृता आणि नील यांचा हळदी समारंभ पार पडला.
12/ 12
आता 6 जुलैला अमृता आणि नील लग्नबंधनात अडकणार आहेत.