साईबाबाच घडवणार बापलेकीची भेट? वाचा ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेच्या पुढच्या भागात काय घडणार
स्टार प्रवाहवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मालिकेचं कथानक सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणार येऊन पोहोचलं आहे.
|
1/ 8
स्टार प्रवाहवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मालिकेचं कथानक सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणार येऊन पोहोचलं आहे.
2/ 8
स्वरा आणि तिच्या बाबांची भेट होणार का? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. चिमुकल्या स्वराने काही दिवसांपूर्वीच आपल्या आईला गमावलं. एकीकडे आईला गमावल्याचं दु:ख तर दुसरीकडे मामीकडून होणारा जाच.
3/ 8
यासर्वात स्वराने मामाच्या सांगण्यावरुन वेष बदलून बाबांचा शोध घेण्यासाठी मुंबई गाठली. मायानगरी मुंबईत वडिलांचा शोध घेण्यासोबतच स्वराचा जगण्यासाठीही संघर्ष सुरु झालाय.
4/ 8
रहायचं कुठे? हा प्रश्न तर आहेच. मात्र पोट भरण्यासाठीही तिला बरीच धडपड करावी लागतेय.
5/ 8
बाबांची लवकरात लवकर भेट व्हावी अशी तिची इच्छा असतानाच योगायोगाने साईबाबांच्या मंदिरात स्वरा आणि तिचे बाबा एकत्र येतात.
6/ 8
मंदिरात दोघं एकत्र येतात खरे पण बाप-लेकीची भेट होणार का याची उत्सुकता आता वाढली आहे.
7/ 8
ठाणे वर्तक नगर येथील प्रतिशिर्डी मानल्या जाणाऱ्या साईबाबा मंदिरात बाप-लेकीसोबतचा हा खास सीन शूट करण्यात आला आहे. या सीनसाठी संपूर्ण टीमने विशेष मेहनत घेतली असून जास्तीत जास्त रिअल लोकेशनचा वापर करण्यात येत आहे.
8/ 8
विशेष म्हणजे या सीनसाठी एक खास गाणं बनवण्यात आलं आहे. मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद फेम स्वरा बनसोडेने हे गाणं गायलं असून कौशल इनामदार यांनी ते संगीतबद्ध केलं आहे. या गाण्याच्या ओळी हेमंत सोनावणे आणि दीप्ती सुर्वे यांनी लिहले आहेत.