Ali Baba Daastan-e-Kabul: 'अलिबाबा'मध्ये नव्या मरियमची एन्ट्री; 'या' अभिनेत्रीने घेतली तुनिषाची जागा
Alibaba Dastan E Kabul New Mariyam: 'अलीबाबा: दास्तान-ए-काबुल' या लोकप्रिय मालिकेतील मुख्य अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येने मनोरंजनसृष्टीसह सर्वांनाच धक्का बसला होता.
'अलीबाबा: दास्तान-ए-काबुल' या लोकप्रिय मालिकेतील मुख्य अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येने मनोरंजनसृष्टीसह सर्वांनाच धक्का बसला होता.
2/ 8
अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर काही काळ मालिका बंद ठेवण्यात आली होती. मात्र आता मालिकेत तुनिषाची जागा नव्या अभिनेत्रीने घेतलेलं समोर आलं आहे.
3/ 8
मीडिया रिपोर्ट्सनुसार मालिकेत नव्या मरियमची एन्ट्री झाली आहे. अभिनेत्री मनुल चूडासमा यामध्ये नव्या मरियमच्या रुपात दिसणार आहे.
4/ 8
मुख्य अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर मालिकेत अभिनेत्री अवनीत कौरला घेतलं जाणार असल्याचं सांगण्यात येत होतं. परंतु अखेर मनुलची वर्णी लागली आहे.
5/ 8
मनुल याआधी 'ब्रीज के गोपाल' या शोमध्ये राधाच्या भूमिकेत दिसली होती.
6/ 8
मात्र कमी टीआरपीमुळे ही मालिका अल्पावधीतच बंद करण्यात आली होती.
7/ 8
ई टाईम्ससोबत संवाद साधताना मनुलने म्हटलं की, “रिप्लेस हा शब्द योग्य नाही. मी तुनिषाची जागा घेत नाहीय. हे पात्र मी नव्या पद्धतीने साकारणार आहे. मी या शोमध्ये तुनिषाची जागा कधीच घेऊ शकत नाही.
8/ 8
ही व्यक्तिरेखा तिने खूप छान साकारली होती. मला आशा आहे की प्रेक्षकांना हा कार्यक्रम पुन्हा आवडेल आणि आम्हाला पूर्वीसारखेच प्रेम मिळेल.