'स्वराज्यरक्षक संभाजी'नं आपलं चौथं स्थान कायम ठेवलंय. शिवाजी महाराजांचं देहावसान झाल्याचं संभाजी महाराजांना कळतं, तो बसलेला धक्का त्याचं बेअरिंग डाॅ. अमोल कोल्हेनं चांगलंच पेललं होतं. या ऐतिहासिक मालिकेत प्रत्येक कलाकार ती ती व्यक्तिरेखा जिवंत उभी करतात. प्रेक्षकांसमोर इतिहासच उभा राहतो. म्हणून ही मालिका नेहमीच पाचात असते.
यावेळी धक्का बसलाय तो 'तुला पाहते रे' मालिकेला. गेली अनेक आठवडे ही मालिका नंबर दोनवर होती. मध्येच ती नंबर वनही झालेली. पण या आठवड्यात ती तिसऱ्या स्थानावर आलीय. डिसेंबरचा पहिला आठवडा हा विक्रांत आणि ईशामधल्या गैरसमजावरच होता. कदाचित त्याचा परिणाम फारसा चांगला झाला नाही. प्रेक्षकांना विक्रांत आणि ईशाला एकत्रच पाहायला आवडत असावं.