टीआरपी रेटिंगची गणितं दर आठवड्याला बदलत राहतात. यावेळी पाचव्या स्थानावर आहे चला हवा येऊ द्या. गेल्या वेळी हा शो तिसऱ्या नंबरवर गेला होता. पण यावेळी पुन्हा एकदा हवा पाचव्या स्थानावर आलीय. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात शोमध्ये सिनेमाचीच प्रमोशन्स होती. अनेकदा विनोदातही साचलेपण येतं, त्यामुळेही हा शो पाचव्या स्थानावर आलाय.
कुठल्या मालिकेचं काहीही होवो, माझ्या नवऱ्याची बायको पहिलं स्थान सोडायला तयार नाही. आता तर मालिकेत गुरू शनायाशी लग्न करायला निघालाय. त्यात अजून एक प्रेमाचा ट्रॅक सुरू आहे. तो म्हणजे जेनीचा. ख्रिश्चन आणि गुजराती लग्नाचा बारही लवकर उडणार. राधिका, शनाया, शनायाची आई यांच्यातल्या चढाओढी प्रेक्षकांना पाहायला आवडतायत.