दर आठवड्याप्रमाणे टीआरपी रेटिंग सगळ्यांच्या समोर आलंय. यावेळी एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे जागो मोहन प्यारे मालिका पहिल्या पाचात आलीय. तिनं 'चला हवा येऊ द्या' मालिकेला पहिल्या पाचातून बाहेर फेकलंय. ही मालिका पाचव्या नंबरवर आहे. यात गरीब नवरा, कजाग बायको आणि नवऱ्याला समजून घेणारी घरातली कामवाली बाई अशी ही त्रिसूत्री. अतुल परचुरे, सुप्रिया पाठारे आणि श्रुती मराठे यांची जुगलबंदी चांगलीच रंगलीय.
गेल्या वेळी 'तुला पाहते रे' चौथ्या स्थानावर होती. यावेळी ती दुसऱ्या नंबरवर आलीय. रविवारी झालेल्या महाएपिसोडचा हा परिणाम असावा. विक्रांत आणि ईशाची प्रेमकहाणी आता रंजक वळणावर पोचलीय. बंगलोरला जायला निघालेल्या विक्रांतनं तिची बस थांबवून तिला परत आणलं. पण अजूनही तो तिचं प्रेम व्यक्त करत नाहीय. ईशाही इरेला पेटलीय. लोकांची उत्सुकता वाढवायला मालिका यशस्वी ठरलीय.