छोट्या पडद्यावर अशा अनेक अभिनेत्री आहेत. ज्यांची तुफान लोकप्रियता आहेत. अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनाही त्या टक्कर देतात. पाहा कोण आहेत. टीव्हीची प्रसिद्ध मालिका 'अनुपमा' मधील अभिनेत्री रुपाली गांगूली जवळपास सगळ्या घरांमध्ये ओळखली जाते. मालिकेला नेहमीच हा टीआरपीही पाहायला मिळतो. स्टार प्लसवरील मालिका 'इमली' मधील अभिनेत्री सम्बूल तौकीर देखील मालिकेनंतर फारच लोकप्रिय झाली आहे. भाभी जी घर पर हैं! मालिकेतील साधीभोळी 'अंगूरी भाभी' म्हणजेच अभिनेत्री शुभांगी अत्रेही घराघरांत प्रसिद्ध आहे. अनेक वर्षे टीव्ही वर चाललेली मालिका 'कुमकुम भाग्य' मधील प्रज्ञा म्हणजेच अभिनेत्री श्रीति झा देखील फारच लोकप्रिय आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई मालिकेतील आहिल्या म्हणजेच अभिनेत्री आदिती जलतारे फारच लोकप्रिय झाली आहे. अभिनेत्री जन्नत जुबैर रहमानी टीव्ही आणि म्युझिक व्हिडीओ तसेच सोशल मीडियामुळे फारच लोकप्रिय झाली आहे. १९ व्या वर्षीच तिचे लाखो फॉलोवर्स आहे. यानंतर अभिनेत्री अवनीत कौरनेही मोठी प्रसिद्धी मिळवली आहे. कमी वयातच तिला मोठी लोकप्रियता मिळवली आहे. अनुष्का सेन देखील टिव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. नुकतीच ती खतरों के खिलाडीचं शुटींग पूर्ण करूण आली आहे.