कविता मेढेकरचा आज वाढदिवस. मालिका, नाटक यात अधिराज्य गाजवणाऱ्या कविताचा आज वाढदिवस. ती आजचा दिवस कसा साजरा करणार, याबद्दल आम्ही तिला विचारलं.
2/ 7
कविता बऱ्याच वर्षांनी नाटक करतेय. एका लग्नाची पुढची गोष्टची रिहर्सल जोरात सुरू आहे.
3/ 7
कविता सांगते, ' आजचं सेलिब्रेशन फक्त नाटक, नाटक आणि नाटक. आम्ही सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत नाटकाची रिहर्सल करणार.'
4/ 7
कविता सांगते, 'आज माझी मुलं म्हणत होती की सेलिब्रेशन करूया. पण मी त्यांना म्हटलं नाटक मार्गी लागू दे. नंतर करू.'
5/ 7
कविताला सेलिब्रेशनची आवड आहे. ती म्हणाली, आपण नेहमीच कसलं ना कसलं सेलिब्रेशन करत असतोच.
6/ 7
कविता सांगते, 'मला दिवाळी आणि वाढदिवस दोन्ही खूप आवडतात. त्या दिवशी मी नवे कपडे घालते.' कवितानं आजच्या दिवशीही नवा ड्रेस घातलाय.
7/ 7
कविताचं आता सगळं लक्ष एका लग्नाची पुढची गोष्ट नाटकाकडे आहे. त्याबद्दल बोलताना ती म्हणाली, 'नाटकातली ही नवी मनी बदललेली आहे. तिचा दृष्टिकोन बदललाय आणि मला ती खूप आवडतेय.'