

बंगाली सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि पश्चिम बंगाल येथील बशीरघाटकडून तृणमूल काँग्रेसची खासदार नुसरत जहां (२८) लग्नबंधनात अडकली. तृणमूल काँग्रेसच्या या खासदारने संसदेत जाऊन शपथ घेतली नाही. नव्या सरकारचं पहिलं संसदीय सत्र १७ जूनला होतं. यात नव्याने खासदार झालेल्यांनी शपथ घेतली. यादरम्यान टीएमसीच्या खासदारांचे शपथविधी हा चर्चेचा विषय होता. कारण टीएमसी खासदारांच्या शपथविधीवेळी जय श्रीरामच्या घोषणा झाल्या. पण या सगळ्या चर्चेत नुसरत मात्र तिथे उपस्थित नव्हती. ती तिच्या हळदीमध्ये व्यग्र होती. बुधवारी तिने हिंदू पद्धतीने लग्न केलं.


नुसतर जहां ही बंगाली सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. लोकसभा निवडणुकीसाठी तिचं नाव जेव्हा पुढे आलं तेव्हा सर्वात सुंदर उमेदवार अशी चर्चा राजकीय वर्तुळात व्हायला लागली. आता सर्वात सुंदर खासदार हे बिरूद तिला मिळालं आहे.


नुसरतने आपल्या राजेशाही लग्नासाठी तुर्की हे डेस्टिनेशन निवडलं. १९ जून ते २१ जूनपर्यंत हे डेस्टिनेशन वेडिंग तुर्कीत होणार आहे.


निखिल कोलकात्यातील प्रसिद्ध कपड्यांचा व्यावसायिक आहे. नुसरत आणि निखिल यांची पहिली भेट २०१८ मध्ये दुर्गा पूजेदरम्यान झाली. अगदी थोड्या वेळात त्यांच्यात घट्ट मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.


१९ जूनला हिंदू पद्धतीने लग्न करण्यात आलं. त्याआधी १७ जूनला प्री-वेडिंगची धमालही करण्यात आली तर १८ जूनला संगीत ठेवण्यात आलं होतं.


नुसरतने आपल्या लग्नात प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जीने डिझाइन केलेला लेहंगा घातला होता. तर निखीलने सब्यसानेच डिझाइन केलेली शेरवानी घातली होती.


राजकारणात येण्यापुर्वी नुसरतने मॉडेलिंग आणि अभिनयात आपलं नाणं खणखणीत वाजवलं. ८ जानेवारी १९९० मध्ये कोलकत्यात जन्मलेली नुसरत ही बंगाली सिनेसृष्टीतील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे.


नुसरतने २०१० मध्ये फेअर वन मिस कोलकताचा किताब जिंकला होता. यानंतर नुसरतने मॉडेलिंग क्षेत्रात पदार्पण केलं. तिच्या सौंदर्याची चर्चा बंगाली सिनेसृष्टीमध्ये एवढी झाली की तिला अनेक सिनेमांच्या ऑफर्स येऊ लागल्या.


नुसरतने राज चक्रवर्तीच्या शोत्रु सिनेमातून टॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यानंतर तिने मागे वळून पाहिलं नाही. आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने तिने लाखोजणांना आपले चाहते केले.


आपल्या आठ वर्षांच्या करिअरमध्ये तिने आतापर्यंत १९ सिनेमांमध्ये काम केलं आहे. तर तिचा सेवेन हा सिनेमा प्रदर्शनाच्या मार्गावर आहे.


नुसरतला एकूण ७ लाख ८२ हजार ०७८ मत मिळाले. ही मतं एकूण मतदानाच्या ५६ टक्के एवढी होती. भाजपचे उमेदवार सायंतन बसु यांना ४ लाख ३१ हजार ७०९ मतं मिळाली होती.


सर्वात कमी वयात खासदार झालेल्या नुसरतला देशभरातून लग्नाच्या शुभेच्छा मिळत आहेत. ती सर्वात कमी वयातील महिला खासदारही आहे.