उत्तरण या मालिकेतून प्रकाशझोतात आलेली टिना दत्ता ही छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. टिना मालिकांसोबतच गेल्या काही काळात सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय राहू लागली आहे. ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओंच्या माध्यमातून ती कायम चाहत्यांच्या चर्चेत असते. यावेळी देखील तिने असेच काही बोल्ड फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. मालिकेत सोज्वळ सुनेची भूमिका साकारणाऱ्या टिनाचा हा बोल्ड अवतार पाहून चाहते देखील अवाक् झाले आहेत. काही तासांत हजारो नेटकऱ्यांनी या फोटोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.