जबरदस्त डायलॉग्स, धमाल कॉमेडी पण तेवढीच मारामारी आणि टशन असं कॉम्बिनेशन असलेली मसाला मुव्ही म्हटलं की दबंग सिनेमाचं नाव डोळ्यासमोर येतं. दबंग सिनेमाचे तिन्ही भाग अशा सगळ्या मसाल्याने भरलेले आहेत. दबंग 3 नेही सलमानच्या चाहत्याचं मन जिंकलं. या सिनेमाच्या निमित्ताने सई मांजरेकर (Sai Manjrekar ) ही मराठी अभिनेत्री पहिल्यांदा बॉलीवूडमध्ये झळकली. या सिनेमानंतर माझं आयुष्यच बदलून गेलं असं तिचं म्हणणं आहे.
दबंग 3 मधील रोलची कशी तयार केली याबद्दल सई म्हणते, “या सिनेमातली माझी भूमिका मला अत्यंत आवडली होती. भूमिका समजून घेण्यासाठी प्रभूदेवा सरांनी फार मदत केली. या सिनेमासाठी उत्तर प्रदेशात बोलली जाणारी भाषा आत्मसात करुन घ्यावी लागली त्यासाठी वेगवेगळे सिनेमे पाहिले तसंच मी माझ्या वडिलांसोबत गावागावात शूटिंगलाही जात असे त्याची बोलण्याची पद्धत, लहेजा समजून घेतला.”