बॉलिवूड किंग अर्थातच शाहरुख खान कमाईमध्ये नेहमीच सर्वांच्या पुढे असतो. मात्र याबाबतीत त्याची पत्नीसुद्धा अजिबात मागे नाही. पत्नी गौरी एक निर्माती तर आहेच शिवाय ती एक प्रसिद्ध इंटेरियर डिझायनर आहे. यामध्ये ती कोटींची कमाई करते. तसेच गौरीने मुकेश अंबानी, Roberto Cavalli आणि Ralph Lauren सारख्या मोठ-मोठ्या लोकांच्या इंटेरियर डिझाईनचं काम केलं आहे.
या लिस्टमध्ये बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमारच्या पत्नीचासुद्धा नंबर लागतो. अक्षयची पत्नी अर्थातच अभिनेत्री ट्विंकल खन्ना एक प्रसिद्ध इंटेरियर डिझायनर आहे. तसेच ती लेखिकासुद्धा आहे. लग्नानंतर अभिनयापासून दुसरं असलेली ट्विंकल या बिझनेसमधून कोट्यवधींची कमाई करते. त्यामुळे ती कमाईत आपल्या पतीलासुद्धा टक्कर देते.