मागील वर्षी अनेक हिट सिनेमा आले. पण बॉलिवूडचे खान मात्र मागच्या संपूर्ण वर्षात आपली कमाल दाखवू शकले नाही. शाहरुख, आमिर आणि सलमान या सर्वांचे सिनेमे फ्लॉप झाले. पण याच वेळी काही नव्या अभिनेत्यांनी मात्र बाजी मारत सुपरहिट सिनेमे दिले. त्यामुळे हे चेहरेच भविष्यातील बॉलिवूडचे सुपरस्टार मानले जात आहेत.
2012 मध्ये ‘विक्की डोनर’ मधून बॉलिवूड पदार्पण करणारा अभिनेता आयुष्यमान खुराना सध्या बॉलिवूडमधील ओळखीचा चेहरा बनला आहे. नुताच रिलीज झालेला त्याचा ‘आर्टिकल 15’ विशेष गाजला. याशिवाय आयुष्यमाननं सलग 5 हिट सिनेमे दिले आहेत. ‘बरेली की बर्फी’, ‘शुभ मंगल सावधान’, ‘अंधाधुन’ आणि ‘बधाई हो’ या सिनेमांचा समावेश आहे.