स्टार प्रवाह वरील ठिपक्यांची रांगोळी ही मालिका अल्पावधीत प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. कलाकारांची मोठी टिम मालिकेत काम करतेय. ऑनस्क्रिन कलाकारांची एकत्र फॅमिली आहेच. मात्र ऑफस्क्रिन देखील हे कलाकार तितकेच एकमेकांशी जोडले गेले आहेत. मालिकेचं शुटींग आटपून ही ऑनस्क्रिन फॅमिली खऱ्या आयुष्यात एकत्र फिरायला गेली आहे. ठिपक्यांची रांगोळी फेम कलाकार उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी थेट कोकणात पोहोचले आहेत. अभिनेत्री सुप्रिया पाठारे सह सगळेच सहकलाकार कोकणात सुट्ट्या एन्जॉय करताना दिसत आहेत. कलाकारांनी त्यांचे धम्माल, मस्तीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. पण या फोटोंमध्ये प्रेक्षकांची लाडकी अप्पू मात्र कुठेच दिसली नाहीये. अप्पू कुठे आहे? असा प्रश्न चाहत्यांनी विचारला आहे.