

यंदाचा मेट गाला अनेक कारणांमुळे चर्चेत राहिला. त्यातलं मुख्य कारण म्हणजे सेलिब्रिटींनी घातलेले अतरंगी कपडे. सोशल मीडियावर तर या कपड्यांवर मीम्सचा पाऊस पडला होता. या स्टाइल आता व्हायरल होत असल्या तरी रेखा यांनी अनेक वर्षांपूर्वीच अशा अतरंगी स्टाइल केल्या होत्या.


आता हाच पाहा ना... आज जर रेका यांना मेट गालाचं आमंत्रण असतं तर त्या काहीशा अशाच अंदाजात दिसल्या असत्या.


रेखा यांचं हेड गेअर पाहा. त्यांचा हा लुक फक्त प्रियांका चोप्रालाच नाही तर कॅटी पेरीलाही टक्कर देत आहे.


रेखा यांच्या या फोटोंवरही सध्या सोशल मीडियावर मीम्स तयार झाल्या आहेत. तेव्हा जरी रेखा यांच्या या स्टाइलची चर्चा झाली नसली तरी एवढ्या वर्षांनी मात्र होतेय.


या फोटोमध्ये रेखा यांचा डोळ्यांचा मेकअप कमाल आहे. प्रियांकाच्या मेट गालामधील मेकअपपेक्षा रेखा यांचा हा मेकअप चांगला असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे.


OMG एव्हरग्रीन ब्यूटी अशी ओळख असलेल्या रेखा यांचे कानातले एकदा पाहाच. असं वाटतंय की एकाचवेळी घरात असलेले सर्व दागिने त्यांनी फोटोशुटसाठी घातले.