कोरोना काळात मदतीसाठी पुढे सरसावले 'हे' टीव्ही कलाकार
देशात कोरोनाची भयंकर स्थिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर रुग्णांना बेड, ऑक्सिजन मिळणंही मुश्किल झालं आहे. परिणामी रुग्ण दगावत आहेत. अभिनेता सोनू सूद पाठोपाठ आता टीव्ही कलाकारही मदतीसाठी पुढे सरसावले आहेत.
देशात कोरोनाची भयंकर स्थिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर रुग्णांना बेड, ऑक्सिजन मिळणंही मुश्किल झालं आहे. परिणामी रुग्ण दगावत आहेत. अशातच अनेक सेलिब्रिटीही मदतीला धावून येत आहेत. अभिनेता सोनू सूद पाठोपाठ आता टिव्ही कलाकारही मदतीला पुढे सरसावले आहेत.
2/ 8
बिग बॉस 14 (Bigg Boss 14) फेम साउथ अभिनेत्री निक्की तांबोळी (Nikki Tamboli) कोरोना संक्रमित झाली होती. तिने कोरोनामुक्त झाल्यानंतर रुग्णांना प्लाझ्मा दान करण्याचं ठरवलं आहे.
3/ 8
टीव्ही अभिनेता शोएब इब्राहिमने मजूरांना मदत करण्याचं ठरवलंय. त्याने संपूर्ण महिनाभर 200 मजूरांना रोज जेवण देण्याचा निर्णय घेतला आहे.
4/ 8
अभिनेता गुरमीत चौधरी (Gurmeet Choudhary) देखील कोरोना रुणांना मदत करण्यासाठी पुढे आला आहे. शुक्रवारी त्याने एका दवाखान्यात प्लाझ्मा दान केला. याशिवाय त्याची पत्नी अभिनेत्री देबिना बॅनर्जी ही देखील सप्टेंबर महिन्यात कोरोना पॉझिटिव्ह आली होती, तिने देखील प्लाझ्मा दान केला होता.
5/ 8
गुरमीत चौधरी (Gurmeet Choudhary) कोरोना संक्रमित लोकांना मदत करत आहे. त्याने ट्विट करून लोकांना मदतीचं आश्वासन दिलं आहे. तसंच मदतीसाठी संपर्क करायला सांगितला आहे. अभिनेता सोनू सूदकडून आपल्याला ही प्रेरणा मिळाली असल्याचं तो म्हणाला.
6/ 8
बिग बॉस 14 ची विजेती रुबीना दिलेकने (Rubina dilaik) लोकांना मास्क घाला, सुरक्षित अंतर ठेवा आणि हात स्वच्छ करा, हे नियम पाळण्याचं आवाहन केलं आहे.
7/ 8
अभिनेत्री शेहनाज गिलने फोटो शेअर करत सर्वांना मास्क घालण्याचं आवाहन केलं आहे.
8/ 8
'पवित्रा रिश्ता' फेम अभिनेता महेश शेट्टीने देशभरात COVID-19 च्या वाढत्या केसेस लक्षात घेता सर्व सोशल इन्फ्ल्युएन्सर्स, फेमस सेलिब्रिटीज, सोशल मीडिया युजर्स सगळ्यांना सकारात्मकता पसरवण्याचं आवाहन केलं आहे.