आज व्हॅलेंडाई डे(Valentine's Day) आहे. सगळीकडे प्रेमाचे वारे जोरात वाहत आहे. सेलेब्स देखील प्रेमाच्या रंगात रंगले आहेत. सोशल मीडियावर आणि रील लाईफमध्ये लॉयल आणि परफेक्ट पार्टनर दिसणारे स्टार्स मात्र खऱ्या आयुष्यात तितके फरफेक्ट असणं गरजेचं नाही. असे अनेक स्टार्स आहेत, ज्यांच्या विवाहबाह्य संबंधांच्या बातम्या तसेच चिटींगच्या घटना माध्यमांमध्ये चर्चेत आल्या आहेत. आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहे. (फायल फोटो)
एकवेळ अशी होती की, अक्षय कुमार प्रेमाच्या बाबतीत पक्का खिलाडी होता. मोहरा सिनेमाच्यावेळी अक्षय कुमार आणि रविना टंडन यांच्यातील जवळकिता वाढली होती. दोघे तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. असं म्हणतात की, दोघांनी साखरपुडा देखील केला होता. मात्र नंतर अक्षयने रविनाला सोडून दुसऱ्या व्यक्तीचा हात धरला. (फायल फोटो)
90 च्या दशकात अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टीच्या अफेअरची चर्चा जोरदार रंगली होती. 'मैं खिलाड़ी तू अनाड़ी' या सिनेमाच्यावेळी अक्षय आणि शिल्पा यांच्यातील जवळीकता वाढल्याची चर्चा होती. अक्षयने नंतर शिल्पासोबत ब्रेकअप केले. शिल्पा म्हणाली देखील होती की, अक्षय एकावेळी तिला आणि ट्विंकल खन्नाला डेट करत होता. (फायल फोटो)
रणबीर कपूरचे नाव आतापर्यंत अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं आहे. मात्र सर्वात जास्त चर्चा झाली ती दीपिका पादुकोणसोबतच्या अफेअरची. दोघांच्या लग्नाच्या देखील बातम्या समोर आल्या होत्या. मात्र दीपिकाला अंदाज आला होता की, रणबीर तिला धोका देत आहे. रणबीर त्यावेळी कतरिनाला डेट करत होता. दीपिकाला यातून बाहेर पडायला खूप वेळ लागला होता. (फायल फोटो)
या यादीत दिलीप कुमार यांचे नाव वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल. सायरा बानो यांची आपण फसवणूक केली होती, ही त्यांची सर्वात मोठी चूक होती, अशी कबुली खुद्द दिलीप कुमार यांनीच आपल्या आत्मचरित्रात दिली होती. 1981 मध्ये दिलीप कुमार यांनी सायरा बानो यांना सोडून अस्मा रहमान यांच्याशी लग्न केलं. मात्र दोन वर्षांनी ते पुन्हा सायरा बानो यांच्याकडे आले.(फायल फोटो)
राज कपूर यांनी पत्नी कृष्णा राज कपूर यांच्यासोबत फसवणूक केल्याचंही बोललं जातं. लग्नाआधी राज कपूर यांचे नर्गिस यांच्यावर प्रेम होतं. मात्र घरच्यांनी त्यांचं लग्न लावून दिलं, असं म्हटलं जातं. लग्नानंतरही ते नर्गिसला विसरू शकले नाहीत. अनेक वर्षांनंतर राज कपूर यांनी पत्नी आणि मुलांना न सोडण्याचा निर्णय घेतला. (फायल फोटो)