बॉलिवूडमध्ये अशा अनेक प्रसिद्ध अभिनेत्री आहेत ज्यांनी दिग्दर्शकांशीच लग्नगाठ बांधली होती. पाहा कोण आहेत या अभिनेत्री.
2/ 6
अभिनेत्री अंगीरा धार (Angira Dhar) आणि अभिनेता , दिग्दर्शक आनंद तिवारी (Anand Tiwari ) यांनी नुकतीच त्यांची लग्नाची घोषणा केली आहे. दरम्यान त्यांनी दोन महिन्यापूर्वीच लग्न केलं होतं.
3/ 6
या महिन्याच्या सुरूवातीला अभिनेत्री यामी (Yami Gautam ) आणि दिग्दर्शक आदित्य धार (Aditya Dhar) यांनी अगदी वैयक्तिकरित्या लग्नं केलं तर त्यांनी लग्न झाल्यानंतर चाहत्यांनी ही बातमी दिली होती.
4/ 6
अभिनेत्री राणी मुखर्जी आणि दिग्दर्शक आदित्य चोप्रा यांनी २०१४ साली विवाह केला होता. इटलीत त्यांनी अगदी गुप्तपद्धतीने हा विवाह केला होता.
5/ 6
८०च्या दशकातील अभिनेत्री सोनी राझदान आणि दिग्दर्शक महेश भट्ट यांनी लग्नगाठ बांधली होती. त्यांना अभिनेत्री आलिया भट्ट आणि शाहिन भट्ट या दोन मुली आहेत.
6/ 6
अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि दिग्दर्शक गोल्डी बेहल यांनी २००२ साली विवाह केला होता. तर त्यांना एक मुलगा देखील आहे.