

६० ते ८० च्या दशकात खलनायकांच्या भूमिकेत दिसणारे ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा यांचं नाव सर्वोत्कृष्ट खलनायकांच्या यादीत येतं. आपल्या ५० वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी ३५० हून अधिक सिनेमांत काम केलं. प्रेम यांना रितिका, पुनीता आणि प्रेमा या तीन मुली आहेत. प्रेमाचं लग्न बॉलिवूड अभिनेता शर्मन जोशीशी झालं आहे.


शक्ती कपुर यांच्या नावाला इतर विशेषणाची गरज नाही. त्यांचं नाव हीच त्यांची ओळख आहे. त्यांनी आतापर्यंतचा सिनेकरिअरचा प्रवास स्वतःच्या हिंमतीवर केला. आजही अनेक सिनेमांत शक्ती काम करतात. पण त्यांची मुलगी श्रद्धा कपूरनेही सिनेसृष्टीत स्वतःची ओळख तयार केली आहे. आशिकी २ सिनेमातून पदार्पण करणाऱ्या श्रद्धाने आतापर्यंत एक विलन, बागी, स्त्री आणि हैदरसारख्या सिनेमांत काम केलं आहे.


हिंदी सिनेसृष्टीत वडिलांची भूमिका साकारणारे कुलभूषण खरबंदा यांनी शान सिनेमात शाकालची व्यक्तिरेखा साकारली होती. या खलनायकाला आजही कोणी विसरलेलं नाही. कुलभूषण यांना श्रुती खरबंदा ही मुलगी असून ती फार सुंदर दिसते. श्रुती सोशल मीडियावर फार सक्रियही आहे.


सिनेमांमध्ये नेहमीच आपल्या खलनायकी भूमिकेमुळे समोरच्याचा थरकाप उडवणारे अभिनेते रंजीत यांची मुलगीही फार सुंदर दिसते. रंजीत यांच्या मुलीचं नाव दिव्यांका बेदी असून ती प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे.