'Jee Le Jara' आधी 'हायव्हे' ते 'ZNMD' या रोड ट्रीप चित्रपटांनी जिंकली होती प्रेक्षकांची मनं
‘जी ले जरा’ (Jee Le Zaraa) या नव्या गर्ल्स रोड ट्रीप चित्रपटाची नुकतीच घोषणा झाली आहे. या आधीही अनेक रोड ट्रीप चित्रपटांनी प्रेक्षकांची मनं जिंकली होती.
|
1/ 9
नुकतीच प्रियंका चोप्रा, आलिया भट्ट आणि कतरिना कैफ यांच्या 'जी ले जरा' या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. त्यामुळे चाहते फारच उत्सुक झाले आहेत. पण याआधीही अनेक रोड ट्रीप चित्रपटांनी प्रेक्षकांची मनं जिंकली होती.
2/ 9
प्रियंका चोप्रा (priyanka Chopra), आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) यांचा ‘जी ले जरा’ (Jee Le Zaraa) हा रोड ट्रीप चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता फरहान अख्तर हा चित्रपट घेऊन येत आहे.
3/ 9
सर्वात हिट ठरलेला रोड ट्रिप चित्रपट 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'ने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. चित्रपटात हृतिक रोशन, अभय देओल आणि फरहान अख्तर, कतरिना कैफ, कल्की कोच्लिन यांनी काम केलं होतं.
4/ 9
'दिल चाहता है'ने नुकतेच 20 वर्षे पूर्ण केले आहेत. हा चित्रपटही तरुणाईसाठी हीट ठरला होता.
5/ 9
'हायव्हे' चित्रपट देखील रोड ट्रिपवर आधारित आहे. यात अभिनेत्री आलिया भट्टने काम केलं होतं.
6/ 9
'पीकू' चित्रपटात दीपिका पादुकोण, अमिताभ बच्चन आणि दिवंगत अभिनेता इरफान खान यांची एक रोड ट्रिप पाहायला मिळाली होती.
7/ 9
चित्रपट 'कारवां'मध्येही मिथिला पालकर, इरफान खान आणि दुलकर सलमान यांची रोड ट्रिप पाहायला मिळाली होती.
8/ 9
'एन-एच 10' मध्ये अनुष्का शर्मा, नील भूपालम, दर्शन कुमार, दीप्ति नवल आणि रवि झंकल यांनी काम केलं होतं. यातही रोड ट्रिप पाहायला मिळाली होती.
9/ 9
अंजाना अंजानी देखील एक रोमॅन्टीक कॉमेडी चित्रपट आहे. रणबीर कपूर आणि प्रियंका चोप्राची केमिस्ट्री पाहायला मिळाली होती.