अभिनेत्री सना खान (Sana Khan) सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. सना खानने नुकतंच मौलाना मुफ्ती अनसशी (Mufti Anas) लग्न केलं. लग्नानंतर सतत वेगवेगळी ट्वीट आणि इन्स्टाग्रामवरील पोस्टमुळे ती चर्चेत येत आहे. तिने अभिनय विश्व सोडून धर्माचा मार्ग स्विकारला आहे. बॉलिवूडमध्ये इतरही काही कलाकार आहेत ज्यांनी अध्यात्म मार्ग स्विकारला आहे. (फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
बरखा मदान- 1994 साली मिस इंडिया फायनलिस्ट असणाऱ्या बरखा मदान हिने मॉडेलिंग बरोबरच काही हिंदी आणि पंजाबी सिनेमात काम केले होते. अक्षय कुमारचा 'खिलाड़ियों का खिलाडी' या सिनेमात देखील तिने काम केले होते. दरम्यान 2012 मध्ये बौद्ध धर्मामुळे प्रभावित होऊन तिने धर्मालाच जगण्याचं ध्येय बनवलं आणि ग्लॅमर इंडस्ट्रीला अलविदा केलं. (फोटो सौजन्य- सोशल मीडिया)