सोनल सेहगल ही आज बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिने आपल्या मादक अदांच्या जोरावर एक वेगळा प्रेक्षकवर्ग निर्माण केला.
2/ 10
आज सोनलचा वाढदिवस आहे. 40 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
3/ 10
सोनलचा जन्म चंदिगढमधील एक मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. आंतरमहाविद्यालय सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेत तिनं आपल्या मॉडलिंग करिअरची सुरुवात केली होती.
4/ 10
मॉडलिंग करत असतानाच तिला काही लोकल जाहिरातींमध्ये काम करण्याची संधी मिळाली. या जाहिरातींमुळे तिच्यामध्ये अभिनयाची आवड निर्माण झाली.
5/ 10
त्यामुळे बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी मग ती मुंबईत आली. इथे ती विविध ठिकाणी जाऊन ऑडिशन देत होती. परंतु संधी मिळेपर्यंत ती एका रेस्तरॉमध्ये वेट्रेसचं काम करत होती. या ठिकाणी तिला महिना 3 हजार रुपये पगार मिळत होता.
6/ 10
2003 साली सारा आकाश या मालिकेतून तिने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर कसौटी जिंदगी की आणि हॉटेल किंगस्टन या मालिकेंमध्ये ती झळकली.
7/ 10
दरम्यान जस्सी जैसी कौई नही या मालिकेमुळे ती खऱ्या अर्थानं प्रकाशझोतात आली होती. यामध्ये तिने साकारलेली खलनायिकेची भूमिका तुफान गाजली.
8/ 10
छोट्या पडद्यावर चर्चेत आल्यामुळे सोनलला बॉलिवूडमध्ये देखील संधी मिळाली. 2005 साली यु अँड मी या चित्रपटातून तिने आपल्या बॉलिवूड करिअरची सुरुवात केली होती.
9/ 10
तिचा पहिलाच चित्रपट फ्लॉप झाला पण तीन वर्षानंतर तिला आमिर खानच्या गजनीमध्ये काम करण्याची संधी मिळाली. अन् तिथूनच खऱ्या अर्थानं तिच्या करिअरची सुरुवात झाली.
10/ 10
गेल्या काही काळात तिने जाने कहा से आई है, फ्युचर ब्राईट है जी, फॉरबिटन लव्ह यांसारख्या काही चित्रपटांमध्ये ती झळकली. अन् आज ती प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.