तेजश्री 'होणार सून मी या घरची' या मालिकेतून जान्हवीच्या रूपात घराघरात पोहोचली होती. त्यांनतर तिने मराठी चित्रपट 'ती सध्या काय करते' मध्ये काम केलं होतं.
'अग्गबाई सासूबाई' फेम अभिनेत्री तेजश्री प्रकाशने आपल्या ग्लॅमरस फोटोने सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे. तेजश्रीने नुकताच आपले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
2/ 6
तेजश्री प्रधानने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले खास फोटो शेअर केले आहेत. तसेच त्या फोटोंना फेस्टिव्ह वाईब असं कॅप्शनही दिलं आहे.सध्या चैत्र नवरात्रोत्सव सुरु आहे.
3/ 6
नवरात्रोत्सवामध्ये नऊ दिवस नऊ रंग परिधान केले जातात. आज चैत्र नवरात्रोत्सवचा तिसरा दिवस आहे. आणि आजचा रंग ग्रे आहे. त्यामुळेच तेजश्रीने सुंदर अशा चमकदार साडीमध्ये आपले फोटो शेअर केले आहेत.
4/ 6
या स्टायलिश अशा साडीमध्ये तेजश्री फारच सुंदर दिसत आहे. या ट्रॅडिशनल लुकला स्टायलिश अँड बोल्ड टच देण्यात आला आहे. त्यामुळे अभिनेत्री फारच ग्लॅमरस दिसत आहे.
5/ 6
तेजश्री 'होणार सून मी या घरची' या मालिकेतून जान्हवीच्या रूपात घराघरात पोहोचली होती. त्यांनतर तिने मराठी चित्रपट 'ती सध्या काय करते'मधून चित्रपटात पदार्पण केलं होतं.
6/ 6
तसेच ती काही महिन्यांपूर्वी झी मराठीवरील 'अग्गबाई सासूबाई' या मालिकेत दिसली होती. या मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ आणि गिरीश ओकसुद्धा होते.