देवमाणूस’ (Devmanus) या मालिकेने तुफान लोकप्रियता मिळवली होती. परंतु या मालिकेचा उत्तरार्ध सुरु झाला असून देवमाणूस लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्याजागी एक नवीन गूढ रहस्यमय मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘ती परत आलीये’ (Tee Parat Aaliye) असं या मालिकेचं नाव आहे. या मालिकेत अभिनेत्री कुंजिका काळवीट मुख्य भूमिकेत झळकणार आहे. स्वामिनी या मालिकेतून ती खऱ्या अर्थानं प्रकाशझोतात आली होती. तिचे ग्लॅमरस फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.