'तारक मेहता का उल्टा चश्मा' मध्ये नुकताच अभिनेत्री आराधना शर्माची एन्ट्री झाली आहे. तारक मेहता...मध्ये ती एका डिटेक्टीवची भूमिका साकारत आहे. आराधनाने आपल्या खासगी आयुष्याबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. त्यामुळे ती सध्या चांगलीच चर्चेत आहे. खुलासा करत आराधनाने म्हटलं आहे, ती आपल्या बॉयफ्रेंडसोबत दीड वर्ष रिलेशनशिपमध्ये होती. यादरम्यान त्यांची जवळीक खुपचं वाढली होती. त्यानंतर तएकमेकांच्या संमतीने त्यांच्यात शारीरक संबंध सुद्धा झाले होते. शारीरक संबंध झाल्यानंतर आराधनाच्या मनात काही शंका येत होत्या. तिला असं वाटू लागलं की काहीतरी चुकीचं होतं आहे. त्यानंतर तिने या गोष्टीकडे दुर्लक्ष केल आणि आपल्या कामावर लक्ष केंद्रित केलं. मात्र पुन्हा एके दिवशी आराधनाला काहीतरी शंका वाटू लागली. आराधना म्हणते, यावेळी मला खुपचं थकवा जाणवत होता. त्यामुळे मी पटकन एका मेडिकल स्टोअरमध्ये गेले आणि तेथून एक प्रेग्नन्सी टेस्ट स्ट्रीप खरेदी केली. घरी येऊन मी चेक केलं, तेव्हा माझ्या जीवात जीव आला, कारण रिपोर्ट निगेटिव्ह होता. या मोठ्या खुलास्यामुळे आराधना चांगलीच चर्चेत आहे. सध्या तारक मेहता का उल्टा चश्मामध्ये औषधांचा काळाबाजार रोखण्यासाठी गोकूळधामवासीयांना मदत करत आहे. आराधना शर्माला mtv वरील 'स्प्लीटसविला'या शोमुळे मोठी प्रसिद्धी मिळाली होती.