सध्या मनोरंजनसृष्टीत लग्नसराई सुरु आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. श्रद्धा आर्या, कतरिना कैफ, अंकिता लोखंडेनंतर आता 'तारक मेहता...' फेम जेठालाल अर्थातच दिलीप जोशी यांच्या मुलीचा विवाहसोहळादेखील पार पडला.
2/ 7
'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेतून सर्वांना खळखळून हसायला भाग पाडणारे जेठालाल जोशी एक अत्यंत हळवे बाबा आहेत, हे आज पाहायला मिळालं.
3/ 7
दिलीप जोशी यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या मुलीच्या लग्नाचे काही खास फोटो शेअर केले आहेत. हा विवाहसोहळा अगदी थाटामाटात पार पडला.
4/ 7
दिलीप जोशी यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करताच त्यांचे चाहते तसेच कलाकार मित्र त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
5/ 7
दिलीप जोशी यांची मुलगी नियती जोशीचा विवाहसोहळा काल पार पडला. लग्नाचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहात होता. हा आनंद फोटोमध्ये स्पष्ट दिसून येतो.
6/ 7
दिलीप जोशी आणि त्यांच्या पत्नी आपल्या मुलीला नवरीच्या रूपात पाहून अत्यंत भावुक झाले होते. त्यांनी तिला घट्ट मिठी मारली होती.
7/ 7
मुंबईमधील प्रसिद्ध ताज हॉटेलमध्ये हा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला. दिलीप जोशी यांचा जावई एक एनआरआय आहे.