'तारक मेहता का उल्टा चश्मा' हा असा एक टीव्ही शो आहे, जो वर्षानुवर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या शोमधील सर्व कलाकार प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहेत. जेठालाल असो, दयाबेन असो किंवा मिसेस रोशन सोढी. या शोमधील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये रोशन सोढीच्या पत्नीची भूमिका साकारणारी जेनिफर मिस्त्री बन्सीवाल सध्या चर्चेत आहे. खरंतर जेनिफर मिस्त्रीने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
जेनिफर मिस्त्री बन्सीवालने मुंबईतील जिममधील तिच्या वर्कआउट सेशनचे फोटो शेअर केले आहेत.
3/ 8
हे फोटो अशा वेळी आली आहेत जेव्हा बहुतेक लोक दिवाळी साजरी केल्यानंतर त्यांच्या अतिरिक्त कॅलरीजपासून मुक्त होण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांनी प्रयत्न करत आहेत.
4/ 8
जेनिफर सध्या तिच्या कुटुंबासोबत सुट्टीवर असून सणासुदीच्या काळातही ती जिममध्ये मेहनत घेत असल्याने ती तिच्या तब्येतीकडे लक्ष देत असल्याचे दिसत आहे.
5/ 8
फोटोंमध्ये, जेनिफर तिच्या "वर्कआउट मोड" दरम्यान काळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसून येत आहे.
6/ 8
कधी ती हातात डंबेल धरते, तर कधी जेनिफर ट्रेडमिलवर धावताना दिसते.
7/ 8
जेनिफरबद्दल पूर्वी बातमी आली होती की ती शो सोडण्याचा विचार करत आहे. मात्र, या वृत्तावर त्यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही
8/ 8
यापूर्वी जेनिफरने सोशल मीडियावर दिवाळी सेलिब्रेशनचे फोटोही शेअर केले होते.