Birthday Special : "तुला आनंद देणारी प्रत्येक गोष्ट..." तैमूरच्या वाढदिवसानिमित्त बेबोची पोस्ट
बॉलिवूडचा सर्वात जास्त चर्चेत राहणारा स्टार किड म्हणजे तैमूर अली खान (Taimur Ali Khan). करीना (Kareena Kapoor) आणि सैफ (Saif Ali Khan) प्रमाणेच त्याचाही स्पेशल चाहतावर्ग आहे.
बॉलिवूडचा सर्वात जास्त चर्चेत राहणारा स्टार किड तैमूर अली खानचा आज वाढदिवस आहे. तैमूर आज 4 वर्षांचा झाला आहे.
2/ 9
करीना कपूर खानने तैमूरसाठी खास फोटो शेअर केला आहे. या फोटोला तिने कॅप्शन दिलं आहे, ’20 डिसेंबर 2016 रोजी सकाळी 8 वाजून 49 मिनिटांनी तैमूरचा जन्म झाला. तैमूरने आमच्या आयुष्यात खूप आनंद आणला. तैमूर तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा’
3/ 9
करीना कपूर –खान तैमूरला प्रेमाने टीम टीम असं म्हणते. नेटकऱ्यांनीही तैमूरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
4/ 9
तैमूर अगदी त्याच्या नामकरणापासून चर्चेत होता.
5/ 9
करीनाने तैमूरसाठी पोस्ट शेअर करत लिहीलं आहे, ‘ माझ्या मेहनती मुलावर देवाचा सदैव आशीर्वाद असो. पण वाटेत बर्फवृष्टीचा आनंद घेण्याला, फुलांशी खेळायला, इकडे-तिकडे बागडायला आणि वाढदिवसाचा संपूर्ण केक खायला विसरू नकोस.
6/ 9
‘तुझ्या स्वप्नांचा पाठलाग कर आणि या सर्वांपेक्षा महत्त्वाचं म्हणजे तुला आनंद देणाऱ्या गोष्टी करायला विसरू नकोस.’ असंही करीनाने लिहीलं आहे.
7/ 9
तैमूर लवकरच बडे भाईजान होणार आहे. लवकरच करीना दुसऱ्यांदा आई होणार आहे.
8/ 9
लॉकडाऊनच्या काळात जेव्हा रामायण मालिका टीव्हीवर दाखवण्यात येत होती तेव्हा चिमुरडा तैमूरही रामायण आवडीने बघत असे.
9/ 9
सैफ आणि करीनाप्रमाणेच तैमूरचा मोठा चाहतावर्ग आहे. तैमूरनेही मोठेपणी बॉलिवूडमध्ये यावं अशी आशा त्याच्या चाहत्यांना आहे.