तारक मेहता का उल्टा चश्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही प्रचंड टीआरपी असलेली मालिका आजकाल सतत चर्चेत येत आहे. गोकुळधाम सोसायटीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक सदस्याच्या जीवनावर, त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांभोवती या मालिकेचं कथानक फिरत असतं. या मालिकेत काम करणाऱ्या प्रत्येक कलाकाराचा वेगळा चाहतावर्ग आहे. मालिकेत पोपटलाल (Popalal) ची भूमिका करणाऱ्या श्याम पाठकला (Shyam Pathak) मालिकेतून डच्चू देण्यात आला होता. (Photo Credit- @shyampathakpopu/Instagram)
अभिनेता श्याम पाठक या मालिकेमध्ये 'पोपटलाल'ची भूमिका करतो. पोपटलाल हा अविवाहित पत्रकार आहे. पोपटलालचा देशातच नाही तर परदेशातही मोठा चाहतावर्ग आहे. पण 2017 साली श्याम पाठकच्या हातून एक चूक घडली होती. त्या चुकीमुळे त्याला मालिकेच्या निर्मात्यांनी बाहेरचा रस्ताही दाखवला होता. जेठालालची (Jethalal) भूमिका करणारे अभिनेते दिलीप जोशी लंडनला एका कार्यक्रमासाठी गेले होते. तिथे त्यांना मालिकेचे काही चाहते भेटले. या चाहत्यांनी दिलीप जोशी यांना पोपटलालसोबत एक अॅक्ट करायची गळ घातली.
दिलीप जोशी यांना चाहत्यांचं म्हणणं टाळता आलं नाही. त्यांनी श्याम पाठकला फोन करून अॅक्टसंदर्भात विचारलं. तेव्हा श्याम पाठकनेही लगेच होकार दिला. पण ते लंडनला जाणार आहेत याबाबत मालिकेच्या सेटवर कोणतीही माहिती दिली नाही. काही दिवसांनी श्याम पाठक पुन्हा शूटिंगसाठी सेटवर गेला, तेव्हा त्याला मालिकेतून काढून टाकलं आहे अशी माहिती मिळाली.