'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम 'बबीता'ने खरेदी केलं स्वत:चं घर; मुनमुन दत्ताने शेअर केले Inside Photos
'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम 'बबीता जी' अर्थात अभिनेत्री मुनमुन दत्ताने आपलं स्वत:चं घर खरेदी केलं आहे. याच घरात तिने आपल्या आई आणि कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी केली. मुनमुनने आपल्या घराचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
मुनमुन दत्ताने आपल्या नव्या घरात दिवाळी सेलिब्रेट केली. दिवाळीतील काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य: Instagram @mmoonstar)
2/ 10
हे फोटो शेअर करत तिने नवं घर खरेदी करणं हे स्वप्नचं असल्याचं म्हटलं आहे. (फोटो सौजन्य: Instagram @mmoonstar)
3/ 10
फोटोत मुनमुनने पिवळ्या रंगाच्या सीक्विन्ड ब्लाउजसह गुलाबी रंगाचा लेहंगा घातला आहे. (फोटो सौजन्य: Instagram @mmoonstar)
4/ 10
नव्या घराच्या बालकनीची झलक तिच्या फोटोतून दिसते आहे. (फोटो सौजन्य: Instagram @mmoonstar)
5/ 10
मुनमुनने या फोटोसह एक इमोशनल नोटही लिहिली आहे. तिने शुटिंगच्या बिझी शेड्यूलमधून दिवाळीत कशाप्रकारे नवं घर सजवण्याचा प्रयत्न केला. (फोटो सौजन्य: Instagram @mmoonstar)
6/ 10
तिने एक पोस्ट लिहिली आहे. नवं घर, नवी सुरुवात...नव्या घरात शिफ्ट झालो आहोत...बिझी शेड्यूलमध्ये आजारी पडली होती, परंतु आता ठिक झाल्याचंही तिने म्हटलं आहे. (फोटो सौजन्य: Instagram @mmoonstar)
7/ 10
नव्या घरात पुढील प्रवासासाठी अतिशय उत्सुक आहे. आणखी एक स्वप्न पूर्ण झाल्याचं तिने पोस्टमध्ये म्हटलंय. (फोटो सौजन्य: Instagram @mmoonstar)
8/ 10
'सोशल मीडियावरुन काही काळासाठी ब्रेक घेत, माझ्या आईसोबत आणि सर्वात जवळच्या लोकांसोबत वेळ घालवला. त्यांच्यासोबत शांततेत दिवाळी साजरी केली.' (फोटो सौजन्य: Instagram @mmoonstar)
9/ 10
आज मी जिथे आहे, कोणाच्याही मदतीशिवाय ग्राउंड झिरोपासून सुरुवात करुन पोहोचली आहे. मला स्वत:वर अभिमान असून माझी मेहनत कामी आल्याचंही तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे. (फोटो सौजन्य: Instagram @mmoonstar)
10/ 10
मुनमुनला तिच्या नव्या घरासाठी टेलिव्हीजन इंडस्ट्रीतील अनेक जण, चाहते शुभेच्छा देत आहेत. (फोटो सौजन्य: Instagram @mmoonstar)