

मुंबई. टीव्हीवरील सर्वात चर्चेत असलेला फॅमिली कॉमेडी शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) लॉकडाउननंतर पुन्हा एकदा जनतेच्या मनोरंजनासाठी हजर झाला आहे. या शोमध्ये अनेक बदल पाहायला मिळत आहे. या शोची खासियत म्हणजे यातील प्रत्येक पात्राची स्वतंत्र फॅश फॉलोइंग आहे. सध्या या शोमध्ये भिडे भाईची कन्या सोनूच्या भूमिकेत दिसणारी अभिनेत्री पलक सिंधवानी (Palak Sidhwani) फार चर्चेत आहे. (Photo Credit- @palaksidhwani/Instagram)


पलक सिधवानी सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते आणि आपल्या चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असते. ती आपल्या सोशल मीडियावरुन नवनवे फोटो शेअर करते. नुकतेच पलकने सोशल मीडियावर मेकअपशिवाय फोटो शेअर केले आहेत. या फोटोंची खूप चर्चा सुरू आहे. पलक मेकअपशिवायही खूप सुंदर दिसते, अशी प्रतिक्रिया तिच्या सोशल मीडियावर येत आहे. (Photo Credit- @palaksidhwani/Instagram)


पलकने आपल्या नो-मेकअप फोटो शेअर करीत लिहिले आहे की- आज आयुष्यात जे काही करेन ते सर्वाधिक चांगलं व्हावं हा प्रयत्न करते. मी स्वत:मध्ये शांती आणि सामंजस्य कायम ठेवते. आणि बाहेर सुरू असलेल्या गोष्टींचा माझ्या आनंदावर विरजण घालू देत नाही. मी माझ्या अत्यंत सुंदर जिवनाचा मान ठेवते आणि माझ्याजवळ जे काही आहे त्यासाठी धन्यवाद देते.(Photo Credit- @palaksidhwani/Instagram)


शोबद्दल सांगायचे झाल्यास सोनूच्या भूमिकेत अभिनेत्री पलक सिद्धवानीचं कौतुक केलं जात आहे. आपल्या सौंदर्य आणि क्युटनेसमुळे पलक प्रेक्षकांमध्ये छाप पाडते. याच कारणामुळे तिची फॅन फॉलोइंग वाढत आहे. (Photo Credit-@palaksidhwani/Instagram)


पलक सिद्धवानी टप्पू सेनाचा महत्त्वाचा भाग आहे. आणि आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरही हे फोटो शेअर करीत हे सांगितले आहे. तिचे को स्टार्ससोबत चांगली मैत्री असल्याचे ती सांगते. (Photo Credit-@palaksidhwani/Instagram)