टीव्हीवरची सर्वात गाजलेली सीरिअल म्हणून 'तारक मेहता का उल्टा चश्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)चा उल्लेख केला जातो. ही सीरिअल नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. आता या सीरिअलचं नवं आकर्षण ठरली आहे अभिनेत्री सुनैना फौजदार (Sunayana Fozdar). अत्यंत कमी कालावधीत सुनैनाने 'अंजली मेहता' ही भूमिका आपलीशी केली आहे.