टीव्हीवर साधी भोळी दिसणाऱ्या 'अंजली भाभी'चं रिअल लाइफमधलं बोल्ड PHOTO SHOOT
'तारक मेहता का उल्टा चश्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मधली 'अंजली भाभी' (Anjali Bhabhi) चं कॅरेक्टर अतिशय सिंपल दाखवण्यात आलं आहे. पण हे कॅरेक्टर साकारणारी सुनैना फौजदार (Sunayana Fozdar) रिअल लाइफमध्ये अतिशय बोल्ड आणि ब्युटिफूल आहे. तिने शेअर केलेला लाल साडीतला हॉट फोटो चाहत्यांची वाहवाह मिळवतो आहे.


टीव्हीवर अनेक नवनव्या मालिका येत आहेत पण गेल्या अनेक वर्षांपासून तारक मेहता का उल्टा चश्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिका प्रेक्षकांच्या सर्वात आवडती मालिका आहे. या मालिकेत सध्या अनेक बदल झालेले दिसत आहेत. त्यातलाच एक बदल म्हणजे ‘अंजली भाभी’(Anjali Bhabhi) ह्या भूमिकेसाठी सुनैना फौजदार (Sunayana Fozdar)ने एन्ट्री घेतली आहे. काही दिवसातच सुनैनाने आपल्या अभिनयामुळे प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं आहे. (Photo Credit-@sunayanaf/Instagram)


सुनैनाने आपल्या इन्टाग्राम अकाऊंटवर सुंदर फोटोज शेअर केले आहेत. सुनैनाच्या बोल्ड अँड ब्यूटिफूल लूकने अनेक चाहत्यांना भुरळ घातली आहे. लाल साडीमधल्या तिच्या फोटोला तर लाइक्स आणि कॉमेन्ट्सचा पाऊस पडला आहे.


या फोटोंसोबत सुनैनाने एक मस्त कॅप्शनही लिहलं आहे सुनैना लिहते, “अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हला सतत प्रेरणा देत असते? तीच गोष्ट तुमच्या आयुष्याला पूर्णत्व देण्यासाठी गरजेची आहे”.


सुनैना फौजदार या मालिकेमध्ये अंजली मेहता नावाची भूमिका करत आहे. तिची भूमिका अतिशय दमदार आणि प्रभावशाली आहे.