छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कपल म्हणून गुरमीत चौधरी-देबिना बॅनर्जीला ओळखलं जातं. हे कपल नुकतंच आईबाबा बनले आहेत. काही दिवसांपूर्वी देबिनाने नुकतंच एका गोंडस लेकीला जन्म दिला आहे. त्यांच्यावर सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरम्यान 'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम बबिता अर्थातच अभिनेत्री मुनमुन दत्ताने गुरमीत-देबिनाची भेट घेतली. मुनमुन दत्ताने नुकतंच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये मुनमुन गुरमीत आणि देबिनासोबत दिसून येत आहे. तसेच तिने त्यांच्या लेकीला आपल्या कुशीत घेतलं आहे. मुनमुन दत्ता फोटोंमध्ये फारच आनंदी दिसून येत आहे.ती आनंदाने बाळाला न्याहाळताना दिसत आहे. मुनमुन दत्ताने सुंदर फोटो शेअर करत एक भावुक पोस्टसुद्धा लिहिली आहे.अभिनेत्रीने आपल्या पोस्टमध्ये या दोघांना आपली आवडती जोडी असं म्हटलं आहे. शिवाय अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आणि त्यांच्या विश्वासानंतर आज हा आनंद त्यांच्या घरी आल्याचं तिनं म्हटलं आहे. मुनमुनने आपल्या पोस्टमधून देबिना-गुरमीतच्या लेकीवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.