'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम बबिता अर्थातच अभिनेत्री मुनमुन दत्ता मालिकेत जितकी सुंदर दिसते, रिअल लाईफमध्ये ती तितकीच ग्लॅमरस आहे. मुनमुन दत्ताने नुकतंच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. या शेअर केलेल्या फोटोंमध्ये मुनमुन ग्रीन शिमरी गाउनमध्ये फारच ग्लॅमरस दिसत आहे. अभिनेत्रीचा हा लुक पाहून चाहते घायाळ होत आहेत. अभिनेत्रीच्या गोड हास्याने तिच्या सौंदर्यात आणखीनच भर पडत आहे. मुनमुनच्या या फोटोंवर एका चाहत्याने चक्क तिला लग्नाची मागणी घातली आहे. तर अनेक चाहत्यांनी कमेंट करत मुनमुन दत्ताच्या सौंदर्याचं भरभरून कौतुक केलं आहे. 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेमुळे मुनमुन बबिताच्या रूपात घराघरात पोहोचली आहे. या विनोदी मालिकेतील बबिता आणि जेठालालची केमिस्ट्री चाहत्यांना फारच पसंत पडते. मुनमुन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. अभिनेत्री सतत आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करून चाहत्यांना आपल्या अपडेट्स देत असते.